कोरिया येथे पार पडलेल्या 20 व्या एशियन स्पर्धेत भारतीय संघातून निवड झालेला बेळगांव चा स्केटर देवेन बामणे यांनी चमकदार कामगिरी करत 8 व्या स्थानपर्यंत मजल मारली नुकतेच त्याचे बेळगांव विमानतळावर आगमन होताच विमानतळ प्रशासन प्राधिकरना तर्फे स्वागत व सत्कार करण्यात आला हा सत्कार एस. त्यागराजन (बेळगांव विमानतळ संचालक), ब्रह्मानंद रेड्डी (विमानतळ टर्मिनल व्यवस्थापक एएआय बेळगांव) बेक्कल सर. कौशिक सर यांच्या हस्ते करण्यात हार आणि बुके देऊन करण्यात आला यावेळी बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर यांनी त्याला शॉल व हार घालून त्याचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी देवेन चे आई वडील विनोद बामणे, ज्योती बामणे,लीना कोरिशेट्टी बसवराज कोरिशेटी, स्मिता मेंडके, श्रीकांत मेंडके,श्री शिवराज, नैना शिवराज,बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते