पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्नाटक सीमाभागातील चिकोडी निपाणी रायबाग कागवाड भागातून होणाऱ्या कृष्णा वेदगंगा दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे सीमाभागातील नदी काठावरील नागरिकांच्या पुराची भीती निर्माण झाली आहे.
मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातून कर्नाटक सीमाभागात वाहणाऱ्या कृष्णसह इतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन,. चिकोडी उपविभागातील 8 पूल वजा बंधारे पाण्याखाली गेल्या आहेत. काही मार्गावरील कर्नाटक महाराष्ट्र दरम्यानची वाहतूक बंद झाली आहे. या मार्गावर पोलिसांनी बॅरिकेडस लावून खबरदारी घेतली आहे.
बंद असलेले मार्ग : कृष्णा नदीवरील येडूर- कल्लोळ, बुवाची सौंदती – मांजरी, उगार – कुडची
दूधगंगा नदीवरील मलिकवाड- दत्तवाड, कारदगा- भोज , भोजवाडी – कारदगा, एकसंबा – दतवाड , बारवाड – कुन्नूर , भोजवाडी – कुन्नूर आदी पूल वजा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.