बेळगाव : मच्छे औद्योगिक वसाहतीतील श्रीनगर परिसरात मटका घेणाऱ्या एका युवकाला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याच्याजवळून १७४० रुपये रोख रक्कम व मटक्याच्या चिठ्ठया जप्त करण्यात आल्या आहेत.
जॉन थॉमस कलघटगी (वय ४२) मूळचा राहणार किरवत्ती, ता. यल्लापूर, जि. कारवार सध्या राहणार जयनगर-हुंचेनहट्टी असे त्याचे नाव आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर यांनी मटका घेताना छापा टाकून ही कारवाई केली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात कर्नाटक पोलीस कायदा ७८ अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.