खानापूर : सरकारी मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी सर्वच भागात विशेष मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. यामध्ये पालक व शाळा सुधारणा कमिटीने सहभागी होऊन मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी जबाबदारी घ्यावी असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गर्लगुंजी, बरगाव, निडगल, तोपिनकट्टी, बिदरभावी, सन्नहोसुर, जळगे, रामगुरवाडी, भंडरगाळी या शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. गर्लगूंजी येथील सरकारी प्राथमिक मराठी मुलांची शाळा व मुलींची शाळा येथे शैक्षणिक साहित्य वितरण करताना तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी युवा समितीतर्फे सरकारी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खाती घेण्यात आलेला उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमाला सर्वांनी हातभार लावणे गरजेचे असून मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यामुळे सर्वांनीच मराठीच्या रक्षणासाठी कार्यरत राहिले पाहिजे असे सांगितले.
गर्लगुंजी येथील समिती कार्यकर्ते सुनील पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राजाराम देसाई, सुरेश मेलगे, मिलिंद देसाई, एसडीएमसी अध्यक्ष गोकुळ चौगुले, सतीश पाटील मुख्याध्यापिका एस्. वाय्. सोनार, एस्. बी. पाटील, एन्. एस्. पाटील, एस्. एल्. हळदणकर, डी. एस्. गुरव, ए. आर. कांबळे, एस्. एस्ज काती आदी उपस्थित होते.
सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा रुमेवाडी येथे युवा समितीतर्फे इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष गणेश हल्याळकर, युवा कार्यकर्ते संदेश कोडचवाडकर, प्रवीण कोडचवाडकर, कृष्णा चौगुले, महेश घाडी ,संतोष बेडरे, प्रसाद खटोरे , जोतिबा बेडरे, रामा बिर्जे , अँथोनी फर्नांडिस, मुख्याध्यापक एस डी पाटील व शिक्षक उपस्थित होते
जळगे शाळेत साहित्य वितरण करताना संदेश कोडचवाडकर, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष मल्हारी तोपिनकट्टी,.मारूती लाड, महादेव निक्कलकर, बबन गुरव दिपक तोपिनकट्टी आदी उपस्थित होते.
मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण
