कर्नाटक राज्य सरकारने ‘एसमा’ कायदा लागू करूनही राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रमुख मागण्यांसाठी आज पासून बेमुदत संप पुकारला आहे .बेळगावातील मध्यवर्ती बस स्थानकावर प्रवाशी सकाळ पासून बस च्या प्रतीक्षेत थांबून आहेत .राज्यभरातील परिवहन कर्मचारी आज ५ ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होताहेत .सरकारने ‘एसमा’ कायदा लागू करून आंदोलन थोपवण्याचा प्रयत्न केला असला, तरीही कर्मचारी मागण्यांवर ठाम राहिले आहेत, तीन प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यामध्ये २०२० साली जाहीर केलेल्या १५ टक्के वेतनवाढीची ३८ महिन्यांची थकबाकी द्यावी
२०२३ च्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ३१ टक्के महागाई भत्ता विलीन करून २५टक्के इतकी वेतनवाढ द्यावी, आणि मागील आंदोलनादरम्यान कामावरून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती करावी या मागण्यांचा समावेश आहे.
कर्नाटकात आज राज्य परिवहन कर्मचाऱ्याचा संप ,प्रवाशांचे हाल-मध्यवर्ती बस स्थानकावर प्रवाशी सकाळ पासून थांबून
