वॉर्ड क्रमांक ७ चे नगरसेवक शंकर पाटील यांनी आज एल अँड टी कंपनीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.आणि आपला संताप व्यक्त केला .अवघ्या 20 दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो मात्र २४ तास पाण्यासाठी एल अँड टी कंपनीने बेळगाव शहरात रस्त्याचे खोदकाम सुरु केले आहे ते अजून पूर्ण झालेले नाही
रस्त्यावऱ खोदकाम असेल तर सण साजरा कसा करायचा?”असा प्रश्न शंकर पाटील यांनी उपस्थित केला
२४ तास पाण्यासाठी एल अँड टी कंपनीने बेळगाव शहरात सुरू केलेले रस्त्याचे खोदकाम अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संपूर्ण शहरात रस्त्यांची दुर्दशा झाली असून, अनेक ठिकाणी अजूनही खोदकाम सुरू आहे.या समस्येवर संतप्त नगरसेवकाने संततप्त प्रतिक्रिया व्यक्त केली