होनगा गावातील सर्वसाधारण कुटुंबीयातील आनंदाचे घराण्यातील रामभाऊ आनंदाचे यांच्या पत्नीचे 2020 साली निधन झाले. त्यांचा पाचवा स्मृतिदिन असल्याने रामभाऊ आनंदाचे आणि त्यांच्या मुलांनी मिळून पहिल्या स्मृतिदिना वेळी संकल्प केला. त्यात ज्ञानदान अन्नदान गोदान सुवर्णदान भूदान असे पाच वेगवेगळ्या प्रकारचे दान देण्याचे ठरविले नुकतेच त्यांनी भूदान करण्याचे ठरविले असून याकरिता त्यांनी होनगा येथील गावात 7. 25 गुंटे 50 लाख एवढी जमीन मंदीरला दान स्वरूपात दिली आहे.
2010 मध्ये रामभाऊ आनंदाचे यांच्या पत्नीला कॅन्सरचे निदान झाले त्यानंतर 2020 पर्यंत त्यांनी आजाराशी झुंज दिली. त्यानंतर त्याचे निधन झाले. सुरुवातीच्या काळात एक वर्ष महिना श्राद्ध आणि त्यानंतर वार्षिक श्राद्ध आनंदाचे कुटुंबीयांनी केले. आई-वडिलांच्या आशीर्वादानेच सर्व काही साध्य असल्याने त्यांनी ज्ञानदान अन्नदान गोदान सुवर्णदान करण्याचा संकल्प केला. आतापर्यंत त्यांचे चार दान पूर्ण होत आले आहेत तर येणाऱ्या पाच सहा महिन्यांमध्ये गोदान सुद्धा करणार आहेत.
अशी माहिती यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे
होनगा बेनाळी गावातील सर्व भाविक यांना कळविण्यास अत्यानंद होत आहे कि मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी विठ्ठल मंदिरात सद्गुरू विठ्ठल दादा वासकर यांचे कीर्तन आनंदाचे कुटुंबीयांनी आयोजित केलेले आहे. तसेच मंगळवारी अंगारकी संकष्टीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर आवारातील गणेश मंदिरात सामूहिक चंद्रोदय पूजन व गणेश पूजन होणार असून भक्तांनी मोदक, नारळ नैवेद्य घेऊन यावे विठ्ठल मंदिरात आणून उपस्थित रहावे तसेच पूजनानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसाद आहे तेव्हा सर्वानी याचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.