बेळगाव सीमाभागात कन्नड सक्ती करण्यात येत आहे .तसेच मराठी फलक काढण्यात येत आहेत. त्यामुळे या कन्नड सक्तीविरोधात आज सीमावासीय एकवटले आणि कर्नाटक सरकार मराठी माणसावर जी दडपशाही करत आहे ती दडपशाही थांबवावी ,सरकारी कार्यालय ,बस तसेच आदी सार्वजनिक ठिकाणी कन्नड सोबतच मराठी फलक देखील लावावे .सरकारी कार्यालय मधून मराठी भाषिकांना कागदपत्रे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी मराठी माणसांनी हातात फलक घेऊन जोरदार घोषणा बाजी केली .रहेंगे तो महाराट्र मै नही तो जेल मैं म्हणत आपला जनआक्रोश व्यक्त केला .महाराष्ट्र एकीकरण समितीने कर्नाटक प्रशासनाला एक महिन्याचा अवधी दिला आहे या एक महिन्याच्या अवधीत जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिलाय. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार केला आणि सीमा प्रश्नसंदर्भात मराठी माणसाला योग्य तो न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले .
मोर्चाला परवानगी नाकारली असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय समोर एकत्रित जमुन दिले निवेदन
By Akshata Naik
