असिफ राजू सेठ फाउंडेशनच्या वतीने बेळगावचे युवा नेते अमान सेठ यांनी रामतीर्थनगर येथे वनमहोत्सव उत्साहात साजरा केला. पर्यावरण जागरूकता आणि वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात स्थानिक शालेय विद्यार्थ्यांचा उस्फुर्त सहभाग दिसून आला.
रामतीर्थनगर येथील रहिवासी आणि वन विभाग यांच्या सहकार्याने वनमहोत्सव कार्यक्रमाचे पार पडला .याप्रसंगी बोलताना युवा नेते अमान सेठ यांनी जीवन टिकवून ठेवण्यात, पर्यावरणीय संतुलन राखण्यात आणि समाजाला संसाधने प्रदान करण्यात जंगलांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली.
रामतीर्थ नगर मध्ये वनमहोत्सव साजरा
