गेल्या तीन-चार वर्षांपासून गणेश विसर्जन च्या शेवटच्या दिवशी 36 तासाहून अधिक काळ विसर्जनाला लागत आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी लक्ष घेऊन यंदाच्या वर्षी तो विलंब कसा कमी करावा या संदर्भात पावले उचलले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज पाहणी दौरा केला सर्वप्रथम कपलेश्वर तलाव येथे पाहणी करून संभाजी उद्यान पासून त्यानंतर कपलेश्वर कॉलनी पासून पुन्हा कपलेश्वर तलाव पर्यंत पाहणी केली. त्यानंतर वडगाव कृत्रिम तलावाची पाहणी केली. त्यानंतर हिंडल गणपती च्या समोरील तलावाची सुद्धा पाहणी केली. पाहणी दरम्यान या परिसरातील अडचणी आणि तेथील विविध सुविधा लागणाऱ्या वरती प्रत्यक्षात जाऊन त्याची माहिती घेतली.
या पाहणीदरम्यान पोलिस आयुक्तांसोबत जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, उपाध्यक्ष सतीश गोरगोंडा, कार्यकारी सचिव प्राचार्य आनंद आपटेकर,SPM रोड गणेश मंडळाचे पदाधिकारी अशोक हलगेकर, वाहतूक विभागाचे ACP ज्योतिबा निकम आणि दक्षिण वाहतूक पोलीस निरीक्षक बसनगौडा पाटील, HESCOM सेक्शन ऑफिसर गलगली अधिकारी व परलाद बेलीकटी अधिकारी उपस्थित होते. पोलिस प्रशासनाकडून मिरवणुकीच्या मार्गावरील वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन आणि वेळेवर विसर्जनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
यंदाच्या गणेशोत्सवात विसर्जन मिरवणूक वेळेत व सुरक्षितरीत्या पार पडावी, यासाठी पोलिस विभाग सज्ज असल्याचे आयुक्त बोरसे यांनी यावेळी सांगितले.