बेळगाव – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव तर्फे ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने “अभिजात मराठी काव्य लेखन स्पर्धा – २०२५” जाहीर करण्यात आली आहे. मराठी अस्मिता, संस्कृती, परंपरा व स्वाभिमान यांचा गौरव करणारी तसेच बेळगाव सीमाप्रश्न, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, मराठीची व्यथा-वेदना व संघर्ष, सीमापलीकडील मराठी जीवन या विषयांवर काव्यरूपात आपली भावना व्यक्त करण्यासाठी नवोदित तसेच ज्येष्ठ कवींना ही सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
स्पर्धेअंतर्गत कोणत्याही काव्यप्रकारात सहा कडव्यांची रचना सादर करता येईल. स्पर्धक कर्नाटकातील असावा, ही अट आहे. कविता आपल्या नाव, पत्ता व मोबाईल नंबरसह २० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत दिलेल्या व्हॉट्सॲप 9591929325
गटावर पाठवाव्या.
विजेत्यांचा गौरव अखिल भारतीय बेळगाव मराठी कवी संमेलनात करण्यात येणार असून, मराठीच्या अस्मितेसाठी लेखणी उचलणाऱ्यांसाठी ही स्पर्धा प्रेरणादायी ठरणार आहे.
ही माहिती देत ॲड. सुधीर चव्हाण, जिल्हाध्यक्ष व महिला जिल्हाध्यक्ष अरुणा गोजे-पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव यांनी सर्व कवीबंधूंना व रसिकांना या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
सीमाकवी रवींद्र पाटील 9591929325
(राज्याध्यक्ष ,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कर्नाटक )
“लेखनातून पेटवा मराठी अस्मितेची ज्योत… माय मराठीच्या रक्षणार्थ लेखणी होऊ द्या तलवार!”