बेळगाव प्रतिनिधी
बापट गल्ली, कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवनी पादुका मंदिरात शेवटच्या श्रावण गुरुवारी (दि. 21 रोजी) गणहोम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी साडेसात पासून गणहोम सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे दुपारी 12.30 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच दुपारी चार वाजता मंदिरात श्री सत्यनारायण पूजा होणार आहे. भाविकांनी या सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.