शहरी भागातील शहापूर,वडगाव,जूनेबेळगावसह इतर भागातून शेतकरी महिला शहापूर,अनगोळ,वडगाव,धामणे,माधवपूर,येळ्ळूर शिवारात भांगलण,लावणीसाठी जात असतात.वडगाव ते येळ्ळूर, धामणे,यरमाळ मार्गे मोठ्या प्रमाणात जात असतात.त्यामूळे परिवहन खात्यातर्फे येळ्ळूर रस्त्यावर सिध्दिविनायक मंदिर,बायपास,शहापूर-येळ्ळूर शिवार हद्द तसेच पोतदार पेट्रोल पंपाजवळ रितसर फलकही उभारलेत.पण बसचालक,वाहक त्याठिकाणी बस थांबवत नसल्याने संबधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल रयत संघटनेतर्फे दोनवेळा निवेदन देऊन झाली.ते आश्वासनं देतात पण त्यांचे कोनिच न ऐकता आपलाच हेका ठेवत सदरी रस्त्यावर चालक,वाहक बेजबाबदारपणे बस चालवत वडगावला बसमधे चढले कि थेट येळ्ळूर, यरमाळ,धामणे येथेच बस थांबेल अशी उध्दट उत्तरं देतात.
शनिवारी संध्याकाळी 6 वाजता सर्व शेतकरी महिला घरी येण्यासाठी बायपास जवळील बसथांब्यावर थांबल्या असता बस चालकाने सर्व महिला चढल्याची खात्री करुन किंवा वाहकाला विचारुन बस पूढे चालवायची असते.पण कशाचिही पर्वा न करता पवार गल्ली शहापूर येथील सुमन मुतगेकर हि शेतकरी महिला चढत असता पायरिवर पाय ठेवताच बेजबादारपणे चालकाने बस चालवल्याने जोरात चालवलने ती महिला पायरीवरुन तोल जाऊन रस्त्यावर उतानी आपटल्याने सर्व कमरेला व डोकीला भरपूर मूका मार लागल्याने त्यांना उठताही आलेनाही.त्यानंतर खाली असलेल्या इतर महिलांनी त्यांना रिक्षातून आनून घरी सोडण्यात आले.त्यानंतर त्यांच्यासह इतर महिला व कुटूंबीयासह वडगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेल्यास त्यानी मार जास्त बसला असेलतर आधी ऋग्नालयात दाखल करुन इलाज करा त्यानंतर या म्हणून सांगितल्यावर गणेशपूर गल्ली येथील सिध्दी ऋग्नालयात दाखल करुन डॉक्टरांनी दिलेल्या दाखल्यासह बस नंबरसह रितसर बस चालक,वाहकावर गुन्हा दाखल केला आहे.
असे जर बेदरकारपणे बस चालक-वाहक वागत असतील तर शेतकरी महिलांच्या जिविताची जबाबदारी परिवाहन खात घेणार आहे का ?