No menu items!
Tuesday, September 16, 2025

बेळगाव जिल्हा दसरा जलतरण स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न तनुज सिंग व वेदा खानोलकर यांना वैयक्तिक चॅम्पियनशिप

Must read

युवजन सेवा क्रीडा खाते तसेच जिल्हा आडळीत व जिल्हा पंचायत यांच्यातर्फे आयोजित केलेल्या जिल्हा पातळीवरील दसरा जलतरण स्पर्धा गोवावेस येथील महानगर पालिकेच्या जलतरण तलावात मोठ्या उत्साहाने संपन्न झाल्या. या स्पर्धेत
जलतरणपटूंनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. पुरुष गटात तनुज सिंग तर महिला गटांमध्ये वेदा खानोलकर यांनी वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळवली
जलतरणपटूंची कामगिरी पुढील प्रमाणे
पुरुष गट:- तनुज सिंग चार सुवर्ण, दर्शन वरूर तीन सुवर्ण, स्वयं कारेकर एक सुवर्ण दोन कांस्य, अर्णव किल्लेकर एक सुवर्ण एक कांस्य, आदी शिरसाठ चार रौप्य, स्मरण मंगळूरकर तीन रौप्य एक कांस्य, अभिनव देसाई दोन रौप्य दोन कास्य, मयुरेश जाधव , प्रजित मयेकर, सिद्धार्थ कुरुंदवाड यांनी प्रत्येकी एक कांस्य पदक पटकाविले.
महिला गट :- वेदा खानोलकर पाच सुवर्ण श्रेष्ठा रोटी दोन सुवर्ण एक रौप्य एक कांस्य, निधी मुचंडी एक सुवर्ण दोन रौप्य दोन कास्य, मनस्वी मुचंडी एक सुवर्ण एक रौप्य, प्रणाली जाधव तीन रौप्य एक कांस्य, वैशाली घाटेगस्ती दोन रौप्य दोन कांस्य, ओवी जाधव दोन कांस्य पदके संपादिली.
वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आबा हिंद स्पोर्ट्स क्लबचे एनआय एस जलतरण प्रशिक्षक श्री विश्वास पवार, रणजीत पाटील, संदीप मोहिते, शिवराज मोहिते, कल्लाप्पा पाटील, विजय नाईक, प्रांजल सुळधाळ, शुभांगी मंगळूरकर, विजया शिरसाट, ज्योती पवार, वैभव खानोलकर, विशाल वेसणे, विजय बोगन, किशोर पाटील, मोहन पत्तार ओम घाडी, यांनी विशेष कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय आलेल्या जलतरणपटूंची बेळगाव विभागीय दसरा जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली असून या स्पर्धा दिनांक 15 सप्टेंबर रोजी अशोक नगर येथील आंतरराष्ट्रीय महानगरपालिकेच्या जलतरण तलावात होणार आहेत तरी सर्व विजेत्या खेळाडूंनी सकाळी दहा वाजता हजर राहावे असे युवजन सेवा क्रीडा खात्यातर्फे आव्हान करण्यात आले आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!