बेळगाव शहरातील ‘गणेश चतुर्थी’ ते ‘अनंत चतुर्दशी’ पर्यंत चालणारा गणेशोत्सवाचा आनंदमयी सोहळा कुठलाही अनुचित प्रकार न घडता श्रद्धेने व भक्तिभावाने उत्साहाने बेळगावनगरीच्या वैभवात व कीर्तीत भर घालणारा असा पार पडला त्याबद्दल सर्व गणेशभक्त, गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्ते यांना धन्यवाद!
गणेशोत्सवाच्या निमित्ताने बेळगाव जिल्हा पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी,पोलीस आयुक्त,पालिका आयुक्त, सह-पोलिस आयुक्त, अग्निशामक दल, सर्व वर्तमानपत्रे आणि प्रसार माध्यमे, शासकीय अधिकारी, कर्मचारी, , महापालिका प्रशासन, हेस्कॉम, या सर्वांचे उत्सवा दरम्यान बहुमोल सहकार्य मिळाले. सफाई कामगारांनी सर्व रस्ते त्वरित स्वच्छ करून पर्यावरणाचे रक्षण केले या सर्वांप्रती आम्ही आभारी आहोत कृतज्ञ आहोत. जय गणेश!