मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सव महामंडळ बेळगाव च्या वतीने छावणी परिषद चे सीईओ, मुख्य कार्यनिर्वाह अधिकारी श्री विशाल सारस्वत यांची छावणी परिषद कार्यालयात भेट घेतले. दसरा महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर यांनी येणाऱ्या 2 ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या सीमोल्लंघन कार्यक्रमा साठी लागणाऱ्या तयारीची मदत करावी असे विनंती चे पत्र त्यांना देण्यात आले. सीईओ विशाल सारस्वत यांनी यंदाच्या दसऱ्याला आपल्याकडे सर्व रीतीने सहकार्य करू असे सांगितले. ह्या कार्यक्रमासाठी त्यांच्या कार्यालयातील अभियंता सतीश मनोरकर, सॅनिटरी अधिकारी शिवकुमार हरकुणे , व सतीश गुरव यांना तत्काल या कार्यक्रमाविषयी सहकार्य करण्यास आदेश दिले. याप्रसंगी दसरा महामंडळ चे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, किशोर खोकले, परशुराम किल्लेकर, लक्ष्मण किल्लेकर, बळवंत शिंदोळकर, K.T. पुजारीचे दामोदर पुजारी, दर्शन पाटील,राहुल आवानी उपस्थित होते.
कॅटोन्टमेन्ट चे सीईओ विशाल सारस्वत यांची नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाने घेतली भेट
By Akshata Naik

Must read
Previous articleदौडीचे गल्लोगल्ली स्वागत
Next articleकपिलेश्वराची सिंहावर अरुड झालेली दुर्गादेवी