कर्नाटक सरकारने सुवर्णसौध येथे अधिवेशन घेतले त्याला विरोध म्हणून मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने महामेळाव्याचे २०१७ मध्ये आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला परवानगी घेतली नाही, म्हणून म. ए. समितीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी शुक्रवार दि. ३ रोजी येथील जेएमएफसी चतुर्थ न्यायालयामध्ये होती. मात्र, ती सुनावणी पुन्हा पुढे ढकलली असून पुढील सुनावणी २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.