नुकत्याच बेंगलोर येथील झी स्विमिंग अकॅडमी येथे कर्नाटक राज्य पॅरा जलतरण संघटना आयोजित राज्य पातळीवरील प्यारा जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद क्लबच्या जलतरणपटूणी उत्कृष्ट कामगिरी करताना 10 सुवर्ण 5 रौप्य पदके संपादन केली. कुमार ओम जुवळी याने एक सुवर्ण दोन रौप्य, कुमार शुभम कांबळे दोन सुवर्ण एक रौप्य, कुमार मयांक हलदर एक सुवर्ण दोन रौप्य ,कुमार विशाल पवार एक सुवर्ण, कुमारी संचिता सातपुते तीन सुवर्ण, कुमारी आरोही सुरतकर तीन सुवर्ण अशी पदके संपादन केली.
वरील सर्व जलतरणपटू गोवावेस येथील कार्पोरेशनच्या जलतरण तलावात नियमितपणे सराव करत असून त्यांना एन आय एस प्रशिक्षक श्री विश्वास पवार, रणजीत पाटील, विशाल वेसणे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभते.
राज्य पातळीवरील फिजिकली चॅलेंज प्यारा जलतरण स्पर्धेत ओम, आरोही, संचिता, शुभम, विशाल, मयांक, यांना सुवर्णपदके



