बेळगावात दारूविक्री बंदी लागू करावी, अशी मागणी करत “दारूबंदी आंदोलन कर्नाटक” या संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.बेळगाव तालुक्यात आता दुकान पानपट्टी याठिकाणी दारू विक्री करण्यात येत आहे याचा लहान मुलांवर परिणाम होतोय .गेल्या आठवड्यात 8 वी 9 वी च्या मुलांनी वाढदिवसाची पार्टी करत दारू प्राशन केले आणि त्यातील काही मुले चक्कर येऊन पडली त्यानंतर गावातील महिलांना याची माहिती मिळाली असल्याने त्यांनी दारू विक्री बंद करण्याची मागणी केलीय
हरियाणा, महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्ये महिला ग्रामसभांच्या निर्णयानुसार दारूविक्री पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बेळगावात ही दारूविक्रीवर बंदी आणावी, अशी महिलांनी मागणी केलीय .
कायद्यानुसार, राज्य सरकारने कोणत्याही दारूच्या दुकानाच्या परवानगीसाठी किंवा रद्द करण्यासाठी महिला ग्रामसभेची संमती घेण्याची तरतूद केली होती. मात्र, 2016 साली सरकारने हा कायदा रद्द केला असल्याचा महिलांनी आरोप केला.
बेळगाव तालुक्यात दारू विक्री बंद करण्याची मागणी



