बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कोल्हापूर येथे भारताचे माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष श्री शरद पवार यांची हॉटेल पंचवटी येथे भेट घेऊन सीमा प्रश्नाबद्दल त्यांच्याशी चर्चा करण्यात आली 21 जानेवारी 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्नाच्या दाव्याची सुनावणी होणार असल्याने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाथि कार समितीची लवकरात लवकर बैठक घेण्यासाठी त्यांना विनंती करण्यात आली .कोल्हापूरला आजच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत त्यांच्याशी याबाबत मी बोलतो असे आश्वासन त्यांनी दिले परंतु श्री प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यात भाषण करून मुख्यमंत्री मुंबईस परतल्याने त्यांचे बोलणे होऊ शकले नाही शिष्टमंडळाने कार्यक्रम स्थळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पत्र महर्षी डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा शाल पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला आणि सीमा प्रश्नाकडे तज्ञ समितीचे सभासद म्हणून लक्ष देऊन दावा चालविणाऱ्या वकिलांबरोबर चर्चा करावी असे विनंती केली .कोल्हापुरातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना एकनिवेदन सादर करून उच्चाधिकार समितीची बैठक घेण्यासाठी प्रयत्न करावेत सर्वोच्च न्यायालयातील वकिलांशी सतत संपर्क करून दाव्यांची सुनावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची विनंती करण्यात आली याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो असे श्री शिंदे यांनी सांगितले समितीच्या शिष्टमंडळा खजिनदार श्री प्रकाश मरगाळे सरचिटणीस श्री मालोजी अष्टेकर श्री नेताजीराव जाधवश्री महेश जुवेकर श्रीदत्ता उघाडे श्री सुनील आनंदाचे श्री मारुती मरगा नाचे तसेच खानापूरचे अध्यक्षश्री गोपाळराव देसाई उपाध्यक्ष श्री गोपाळराव पाटील सरचिटणीसश्री आबासाहेब देसाई श्री संजय पाटील श्री पांडुरंग सावंत इत्यादींचा समावेश होता
सीमाप्रश्नी शरद पवार यांची घेतली समिती नेत्यांनी भेट
By Akshata Naik
Must read
Previous articleअगरबत्ती व्यवसायात फसवणूक करणारा अटकेत
Next articleकॅपिटल वन मराठी एकांकिका स्पर्धा जाहीर



