कॅण्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ विशाल यांनी सारस्वत गुरुवारी (दि. ६) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.पदाची सूत्रे हाती घेऊन अडीच महिना झालेला असतानाच त्यांनी हा निर्णय घेतलाय .उत्तर प्रदेश नागरी सेवेत निवड झाल्यामुळे त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे, कॅण्टोन्मेंट बोर्डाचे सीईओपद पुन्हा रिक्त झाले आहे. सारस्वत हे केंद्रीय लोकसेवा
आयोगातर्फे निवड झालेले अधिकारी असून त्यांनी युपीएससीत देशात ५९१ वा क्रमांक मिळविला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश नागरी सेवा परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. युपीएससीनुसार त्यांची नियुक्ती भारतीय संरक्षण इस्टेट सेवेंतर्गत (आयडीईएस) बेळगाव कॅण्टोन्मेंट बोर्ड सीईओपदी झाली होती.
कॅण्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ विशाल यांचा राजीनामा



