बेळगावातून प्रकाशित होणाऱ्या डेली व्ह्यू न्यूज व नवउर्जा या दिवाळी अंकाने यंदा सीमाभाग ओलांडून थेट मुंबईत पोहोचत सांस्कृतिक एकतेचा संदेश दिला आहे.
या अंकाचे मुंबई येथे सुप्रसिद्ध अभिनेता शांतनु मोघे (छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, “संभाजी” व “राव रंभा” चित्रपटांतून प्रसिद्ध) यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी राणी मल्लम्मा चित्रपटाचे निर्माते प्रशांत पाटील (बेळगाव), डेली व्ह्यू व नवउर्जा चे संपादक महादेव पवार, तसेच श्री लक्ष्मीनारायण वधू-वर केंद्राचे संस्थापक व नवऊर्जाचे उपसंपादक यलोजीराव पवार (सर) उपस्थित होते.
अभिनेते शांतनु मोघे यांनी अंकातील नवोदित लेखकांचे लेख पाहून समाधान व्यक्त केले आणि “अशा प्रकारचे सृजनशील प्रयत्न मराठी संस्कृतीला नवी ऊर्जा देतात” असे मत व्यक्त करत दिवाळी अंकाला शुभेच्छा दिल्या.
तर निर्माते प्रशांत पाटील यांनी अंकात समाविष्ट ‘विवाह सोहळ्यातील आचारसंहिता’ या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
या अंकाच्या यशस्वी प्रकाशनासाठी कला श्री ग्रुपचे संस्थापक प्रकाश डोळेकर तसेच विविध जाहिरातदार आणि सहकाऱ्यांचेही मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
बेळगावचा दिवाळी अंक मुंबईत प्रकाशित झाल्याने मराठी साहित्यविश्वात आनंदाचे वातावरण पसरले आहे.



