बेळगाव येथील रहिवाशी शिवानी राजन वाघेला बागलकोट येथील पीएमएनएम डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलची विद्यार्थी असून कारवार येथे आयोजित केलेल्या ५१ व्या आयडीए स्टेट कॉन्फरन्समध्ये तिने भाग घेतला ऑर्थोकेरॅटिनाइज्ड ओडोंटोजेनिक सिस्ट – जबड्याच्या पॅथॉलॉजीमधील या विषयावरील पेपर प्रेझेंटेशनासाठी कर्नाटका स्टेट डेंटल कॉन्फरन्स यांच्या वतीने शिवानीला सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक पेपर प्रेझेंटेशनसाठी हा पुरस्कार देण्यात आला शाल बुके सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तिला डॉ. महादेवी होसूर (ओरल अँड मॅक्सिलोफेशियल पॅथॉलॉजी अँड ओरल मायक्रोबायोलॉजी विभाग) व नवीना शेट्टीगार प्रिन्सिपल जी जी चिटणीस स्कूल, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विशाल वेसने यांचे मार्गदर्शन मिळत आहे
बेळगांवची शिवानी वाघेला सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक पेपर प्रेझेंटेशनसाठी पुरस्कारने सन्मानित
By Akshata Naik



