14 नोव्हेंबर रोजी हा दिवस सगळीकडे बालदिन म्हणून साजरा केला जातो बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही बाल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगांव येथील प्रसिद्ध चित्रकार व माजी मुख्याध्यापक श्री वसंत निर्मळे यांच्या हस्ते सर्व स्केटिंगपटूना मिठाई वाटप करून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले या प्रसंगी त्यांनी सर्व स्केटर्सना या दिवसाचे महत्त्व पटवून सांगितले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी या कार्यक्रमाला समाजसेविका भक्ती शिंदे, शिवानी मोदगेकर, स्नेहल माने, ज्योती जिगजीनी, रिया जिगजीनी, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर व बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे बालदिन उत्साहात साजरा



