बालदिन चे औचित्य साधत गर्लगुंजी गावातील होतकरू खेळाडूंना खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने एकलव्य क्रीडा केंद्र गर्लगुंजी यांच्या वतीने गावातील ज्येष्ठ व्यक्ती आणि पालकांच्या उपस्थिती मद्ये 50 स्पोर्ट्स जर्सी,आणि स्पोर्ट्स किट बॅग बॉटल वितरण करण्यात आल्या, गाव व्यसन मुक्त व्हाव,खेळांची आवड निर्माण व्हावी,मुलांनी खेळातून करिअर करावं हाच मुख्य उद्देश असल्याचे ग्राम पंचायत सदश आणि या स्पोर्ट्स किट चे मुख्य प्रायोजक प्रसाद विट्ठलराव पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.त्याचबरोबर इतर प्रायोजक बाबुराव मेलगे,परशराम गोरे,संतोष मेलगे हे ही उपस्थित होते,प्रमुख वक्ते तालुका पंचायत सदश पांडुरंग सावंत यांनी खेळाचे महत्व पटवून देत मुलांना मार्गदर्शन केले,अध्यक्ष स्थान वरून बोलताना पंचायत माझी अध्यक्ष यांनी गावातील खेळाची परंपरा आणि गावात घडलेल्या उत्तम खेळाडू आणि कुस्तीपटू विषयी माहिती दिली,एकलव्य क्रीडा केंद्र हे दरवर्षी जिल्हा लेव्हल च्या खो खो स्पर्धा आयोजित करतात त्यामुळे खेळाडूंना वाव मिळाला आणि गावातील 48 मुल मिलिटरी,एअरफोर्स, नेव्ही मद्ये 2 वर्षात निवडली गेली त्याचबरोबर गावातील न्यू मराठा स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने उत्तम असे क्रिकेट आणि कब्बडी स्पर्धांचे आयोजन केले जाते त्यामुळे खेळाडूंना वाव मिळाला.आणि विविध ठिकाणच्या स्पर्धा मध्ये प्रथम द्वितीय पारितोषिक मिळाली,असे मत आपल्या भाषणात पाहुण्यांनी व्यक्त केले.
यावेळी अध्यक्ष स्थानी गोपाळ पाटील,प्रमुख वक्ते पांडुरंग सावंत, द्वीप प्रज्वलन माझी अध्यक्ष आणि विद्यमान सदश हणमंत मेलगे,प्रसाद पाटील, पिकेपिएस चेअरमन संजय पाटील,एसडीएमसी अध्यक्ष गोकुळ चौगुले,संतोष पाटील, एसडीएमसी सदश संभाजी मेलगे,मऱ्यापा पाखरे,मोहन भातकांडे,माझी सैनिक बाबुराव मेलगे, एकलव्य क्रीडा केंद्राचे प्रशांत पाखरे,सुमित मेलगे,साईराज गोरे.योगेश मेलगे,स्वप्नील पाटील,अमोल खटोरे,सुरज गोरे ,नागराज गोरे,वेदांत मेलगे ,श्रीधर मलिक ,जकनू गोरे,ओंकार चौगुले,दीपक चौगुले,पुंडलिक पाटील त्याचबरोबर राज्य स्तरीय खेळाडू वैभव गोरे आणि मारुती पाटील,ज्युडो राष्ट्रीय खेळाडू रोहिणी पाटील आणि सर्व विद्यार्थी पालक वर्ग तसेच गावकरी उपस्थित होते.सूत्रसंचालन दिग्विजय मेलगे यांनी केले.
बालदिन निमित्त 50 स्पोर्ट्स जर्सी,आणि स्पोर्ट्स किट बॅग बॉटल वितरित



