नोकरी मिळत नसल्याने एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. १५) गोडसेवाडी येथे घडली. अक्षता लक्ष्मण नांदोडकर (वय २१, रा. गोडसेवाडी, टिळकवाडी) आहे. अधिक माहितीनुसार, अक्षता पूर्वेकडील दुसऱ्या रेल्वे फाटकाजवळील एका कार्यालयात काम करत होती. तथापि,
पगार खूप कमी असल्याने तिने नोकरी सोडली. ती दुसरी नोकरी शोधत होती. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून तिला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे निराश होऊन तिने शनिवारी दुपारी घरी कोणी नसताना स्वयंपाकघरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद टिळकवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.



