बेळगाव:कर्नाटक विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे संशोधक विद्यार्थी आणि बेळगाव येथील वरिष्ठ गुप्तचर सहाय्यक राजेंद्र उदय बडसगोळ यांनी ‘कर्नाटक पोलीस विभाग आणि जनसंपर्क एक अभ्यास’ या विषयावर सादर केलेल्या महाप्रबंधाला विद्यापीठाने मान्यता देऊन त्यांना ‘पीएचडी’ पदवी प्रदान केली आहे.
कर्नाटक विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जनसंपर्क विभागाचे प्राध्यापक डॉ. नागराज हळ्ळी यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र बडसगोळ आपल्या महाप्रबंधासाठी संशोधन पूर्ण केले. राजेंद्र बडेसगोळ हे सध्या बेळगाव येथे गुप्तचर विभागांमध्ये वरिष्ठ गुप्तचर सहाय्यक म्हणून कार्य करत आहेत. गुप्तचर विभागात केलेल्या त्यांच्या उत्कृष्ट आणि महत्त्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना 2022 मध्ये कर्नाटक मुख्यमंत्र्यांकडून सुवर्णपदकही बहाल करण्यात आले आहे. आता त्यांनी सादर केलेल्या ‘कर्नाटक पोलीस विभाग आणि जनसंपर्क एक अभ्यास’ या संशोधनात्मक प्रबंधासाठी कर्नाटक विद्यापीठ धारवाडने मान्यता दिली असून राजेंद्र बडसगोळ यांना प्रतिष्ठेची पीएचडी पदवी प्रदान केली आहे. याबद्दल त्यांचे पोलीस खात्यासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.
बेळगावचे गुप्तचर राजेंद्र बडसगोळ यांना पीएचडी पदवी



