शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी सोसायटी आहे.या सोसायटीत मुदत संपली तरी ठेवी परत न दिल्याने सहकारी सोसायटीच्या अध्यक्षांसह चौघांवर एपीएमसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी विरुपाक्षी राचप्पा यल्लक्कीशेट्टर (रा. शाहुनगर, चौथा क्रॉस) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
त्यानुसार विरुपाक्षी यांनी डिसेंबर २०२१ व २०२३ मध्ये ठेवी ठेवल्या होत्या. ११ टक्के व्याज देण्याचे सांगितल्याने त्यांनी आधी आठ लाख रुपये व त्यानंतर २० लाख रुपये ठेव ठेवली. दोन्हीही ठेवींची मुदत संपल्यानंतर रक्कम मागितली असता टाळाटाळ केली जात होती. पहिल्या ठेवीतील आठ लाखांपैकी तीन लाख रुपये परत केले आहेत. उर्वरीत पाच लाख व दुसऱ्या ठेवीतील २० लाख अशी २५ लाखांची रक्कम देण्यास सोसायटीकडून टाळाटाळ केली जात असल्याची फिर्याद त्यांनी नोंदविली होती
मुदतठेव परत न दिल्याने चौघांवर गुन्हा



