सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कार्तिक अमावस्या (देव दिवाळी) निमित्त मंदिरामध्ये दीपोत्सव व गणपती विसर्जन तलाव परिसरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला या वेळी मंदिरा मध्ये सकाळी रुद्र अभिषेक आणि विशेष पुषअर्चना व लोणी पूजा करण्यात आली सायंकाळी सात्विक कला समुह व मंदिरा चे ट्रस्टी चे हस्ते दीपप्रज्वलन करून दीपोत्सव साजरा करण्यात आला संपूर्ण मंदिर परिसर तलाव हजारो दिव्याच्या प्रकाशात उजळुन गेला होता त्यात आकर्षक अशी विद्युत रोषणाई व आकर्षक अशी फाटकेची आतिषबाजी करण्यात आली यावेळी श्री कपिलेश्वर आरती समूह यांनी कीर्तन करून कार्यक्रम सांगता झाली यावेळी मंदिराचे ट्रस्टी व सेवेकरी व महिला सेवेकरी उपस्थित होते
कपिलेश्वर मंदिरात झाला दीपोत्सव
By Akshata Naik
Previous articleसीईएन निरीक्षक म्हणून जे. एम. कालीमिर्ची रुजू
Next articleमुदतठेव परत न दिल्याने चौघांवर गुन्हा



