माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी शहर सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक म्हणून नुकतीच सूत्रे स्विकारली. बी. आर. गड्ढेकर यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त झाले होते.
गेल्या आठवड्यात शंभरहून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. यामध्ये माळमारुती ठाण्याचे पोलीस निरीक्षक कालीमिर्ची यांचीही बदली झाली. या आदेशात त्यांच्या नवी नियुक्ती देण्यात आली नव्हती. दोन दिवसांपूर्वी त्यांच्याकडे शहर सीईएन पोलीस ठाण्याचा भार सोपवण्यात आला. सोमवारी त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली.
सीईएन निरीक्षक म्हणून जे. एम. कालीमिर्ची रुजू



