महिला विद्यालयात एन. सी. सी. दिना निमित्त रविवार दि. २३.११.२०२५ रोजी विशेष वृक्षारोपण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. या उपक्रमात ५० विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.
या कार्यक्रमाचे नेतृत्व, शाळेच्या मुख्याध्यापिका कविता परमाणिक मॅडम यांनी केले तर एन. सी. सी. च्या ए. एन. ओ. ,पंकजा अमरगोळ यांचे विशेष योगदान लाभले. यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि शाळेचा परिसर हिरवागार करण्याचा संकल्प व्यक्त केला.
एन. सी. सी. दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबद्दल जागृती निर्माण करणे हा होता. शिक्षकवर्गाच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पड्ला
महिला विद्यालय इंग्रजी माध्यमात नोव्हेंबर २०२५ रोजी होणा या ‘एन. सी.सी. दिना” निमित्त विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण उपक्रम



