बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील हिरेमुलांगी गावात एक हृदय द्रावक घटना घडलेली आहे. एका आईने पोटच्या गोळ्याचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी आई अश्विनी हलकट्टी वय 28 हिने एका मुलीला जन्म दिला होता. अश्विनी हिला या आधीच तीन मुली होत्या . त्यामुळे चौथ्यादा गरोदर राहिल्यावर मुलाची अपेक्षा मनात बाळगलेल्या अश्विनीने परत मुलगी झाल्याने निराश होऊन रागेच्या भरात बाळाचे जन्माच्या तिसऱ्या दिवशीच गळा दाबून हत्या केली
सदर मुलीची अश्विनी ची आई घरी नसल्याचे पाहून तिने हे कृत्य केले त्यानंतर जेव्हा अश्विनी ची आई घरी आली त्या व्यक्तीने नाटक रचून आपली मुलगी श्वास घेत नसल्याचे सांगितले. यावेळी बाळाला रामदुर्ग येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी बाळाचा गळा दाबून खून झाला असल्याचे सांगितले आहे सध्या आईविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
चौथ्यांदा मुलगी झाल्याने जन्माच्या तिसऱ्या दिवशीच नाटक रचुन मुलीचा गळा दाबला केला खून



