कलबुर्गी जिल्ह्यात एका रस्ते अपघातात राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकारी महांतेश बिलागी यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला.
वरिष्ठ आयएएस अधिकारी महांतेश बिलागी हे एका कौटुंबिक लग्न समारंभाला जात होते. त्यावेळी त्यांच्या वाहनाला अपघात झाला. महांतेश बिलागी हे कर्नाटक राज्य खनिज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.
वरिष्ठ आयएएस अधिकारी महांतेश बिलागी हे त्यांचा भाऊ आणि आणखी एका व्यक्तीसह बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथून कलबुर्गी येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात होते. दरम्यान जेवरगी तालुक्यातील गौनाली क्रॉसजवळ अचानक त्यांच्या गाडीसमोर एक कुत्रा आला. कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली. या अपघातात महांतेश बिलागी, त्यांचा भाऊ शंकर बिलागी आणि इराणा शिरसांगी यांचा मृत्यू झाला.
IAS अधिकाऱ्यासह तिघांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू



