कर्नाटक सरकारच्या वतीने बेळगावमध्ये ८ डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन भरविण्यात येणार असून, सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना मागील काही वर्षे बेळगाववर आपला अधिकार दाखवण्यासाठी आणि त्याद्वारे तीव्रतेने कन्नड भाषासक्ती राबविण्यासाठी हे हिवाळी अधिवेशन भरविण्याचा घाट घातला जात आहे. त्याला विरोध म्हणून आणि सीमाभागातील मराठी भाषिकांची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा तसूभरही कमी झाली नाही हे दाखवून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. सोमवार दिनांक ८ डिसेंबर रोजी समितीच्या वतीने चार पैकी एका नियोजित स्थळी महामेळावा होणार असून मराठी भाषकांनी सदर महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामेळावा यशस्वी करावा असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, सरचिटणीस श्रीकांत कदम तसेच सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
महामेळाव्याला मोठ्या संख्येने सामील व्हा : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन
By Akshata Naik
Previous articleकेबिनमध्ये अडकलेल्या चालकाला जीवदान



