येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल शाळा येथे नूतन एसडीएमसी अध्यक्षा म्हणून सौ. दिव्या कुंडेकर यांची निवड झाली. 2023-26 या सालातील एसडीएमसी अध्यक्षा म्हणून सौ.रूपा धामणेकर त्याचबरोबर सौ.गायत्री बिर्जे या सदस्या म्हणून होत्या. सरकारच्या नियमानुसार त्यांचा कार्यकाल संपल्यामुळे नूतन एसडीएमसी अध्यक्षा म्हणून सौ.दिव्या कुंडेकर यांना निवडण्यात आले. या दोन सदस्यांबद्दल नवीन सदस्य सौ. ज्योती जोतिबा पाटील आणि सौ अर्चना देसाई यांची निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया येळळूर ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. लक्ष्मी मासेकर आणि ग्राम विकास अधिकारी श्रीमती पुनम गडगे यांच्या उपस्थितीत पार पाडली. यावेळी माजी अध्यक्षा सौ.रूपा धामणेकर आणि सौ.गायत्री बिर्जे यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार व निरोप देण्यात आला. तसेच नूतन एसडीएमसी सदस्यांचे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर ग्रामपंचायतीकडून नवीन स्मार्ट टीव्ही आणि यूपीएस देण्यात आले. त्याचे उद्घाटन ग्रामपंचायत अध्यक्षा सौ लक्ष्मी मासेकर व पीडीओ पुनम गडगे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर युनियन बँक येळ्ळूर शाखा यांच्याकडून शाळेला दोन नवीन तिजोरी देण्यात आल्या.त्या तिजोरीचे उद्घाटन युनियन बँक येळ्ळूर शाखेचे मॅनेजर अभिजीत सायमोते यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रम प्रसंगी श्री अभिजीत सायमोते यांनी मोबाईल आणि त्याचे दुष्परिणाम आणि त्यापासून विद्यार्थ्यांना तसेच आपल्या मुलांना कसे दूर ठेवू शकतो याबद्दलचे मार्गदर्शन उत्तमरीत्या केले. सिद्धार्थ पाटील यांनी इयत्ता सातवी मध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्याला 1001, द्वितीय क्रमांक 700 आणि तृतीय क्रमांक 500 रुपये देण्याचे जाहीर केले . यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. हा संयुक्त कार्यक्रम शाळेच्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी SDMC उपाध्यक्ष श्री जोतिबा उडकेकर हे होते. या कार्यक्रमासाठी एसडीएमसी सदस्य मारुती यळगुकर, मूर्तीकुमार माने, चांगदेव मुरकुटे, दिनेश लोहार, विजय धामणेकर, रेश्मा काकतकर, प्रियांका सांबरेकर, मयुरी कुगजी, शुभांगी मुतगेकर, अलका कुंडेकर,युनियन बँकेचे कर्मचारी सिद्धार्थ पाटील, शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्रकुमार चलवादी, शिक्षक वर्ग, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका श्रीमती एम एस मंडोळकर, प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री आर एम चलवादी, स्वागत व सत्कार श्री एस बी पाखरे, आणि आभार श्रीमती ए वाय मेणसे यांनी मांडले.
मॉडेल मराठी शाळा येळ्ळूरमध्ये नूतन एसडीएमसी अध्यक्ष निवड आणि स्मार्ट टीव्ही व तिजोरीचे उद्घाटन
By Akshata Naik



