२५ कर्नाटका बटालियन एन.सी.सी. च्या सूचने नुसार महिला विद्यालयाच्या एन.सी.सी. विभागातील २५ विद्यार्थीनींनी ८ डिसेंबर २०२५ रोजी महात्मा गांधी पुतळा स्वच्छता उपक्रम राबवला. हा उपक्रम एन.सी.सी च्या ए, एन.ओ, सौ. पंकजा अमरगोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कविता परमाणिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विद्यार्थीनींनी परिसर स्वच्छता, पुतळ्याची सफाई तसेच सजावट करून सामाजीक बांधिलकीचे प्रतीक असलेला स्वच्छता संदेश दिला



