बेळगाव मध्ये अधिवेशना करता आलेल्या आमदारांनी आणि विधानसभा सभापती यु टी खादर यांनी मैदानावर आयोजित केलेल्या बालपणीच्या खेळाचा आनंद लुटला.लेले मैदानावर आज आमदार अभय पाटील यांनी लहानपणीच्या खेळाचे आयोजन केले होते.यावेळी यामध्ये गोटया विटी दांडू भोवरा फिरविणे कबड्डी खो-खो दोरीच्या उड्या यासारख्या अनेक मैदानी खेळाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी आमदार सिद्धू सवदी यांनी जुने खेळ आपल्याला चांगली ऊर्जा देतात आपल्या आरोग्य चांगले राहते तसेच बौद्धिक विकास देखील होण्यास मदत मिळते त्यामुळे अशी खेळ खेळणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले त्याचबरोबर या खेळाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार अभय पाटील यांनी या सर्व खेळातील साहित्य उपलब्ध करून जनतेला हे खेळ खेळण्याकरिता प्रोत्साहन दिले. तसेच स्वतः देखील टायर फिरवण्यासहित विटी दांडू फिरवून आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
यात प्रसंगी आमदार विश्वनाथ यांनी देखील विटी दांडू भोवरा फिरविणे हे खेळ खेळले आणि मोबाईल पासून मुलांनी दूर राहून मैदानी खेळाकडे आले पाहिजे असे सांगितले.
लेले मैदानावर आयोजित करण्यात आलेले बालपणीचे खेळ हे आमदार अभय पाटील आमदार सिद्धू सौदी आमदार विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते यावेळी त्यांनी स्वतः या खेळाचा आनंद घेतलास त्याशिवाय या ठिकाणी मॉर्निंग वॉक साठी आलेल्या नागरिकांना तसेच मुलं महिला युवती यांना देखील हे मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले.



