१२ डिसेंबर २०२५ म्हणजेच शुक्रवारी महिला विद्यालय मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळेने बेळगाव येथील गोगटे रंगमंदिर येथे ‘वार्षिक दिन २०२५’ आयोजित केला. दोन सत्रांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळचे सत्र इयत्ता पहिली ते पाचदी आणि दुपारचे सत्र इयत्ता सहावी ते दहावीसाठी होते. सकाळच्या सत्रात वार्षिक दिनाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती स्नेहल कांडेकर, कथक विशारद उपस्थित होत्या आणि दुपारच्या सत्रात फिजिओथेरपिस्ट, भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. दीप्ती शेट्टी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या प्रसंगी शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य अध्यक्ष श्री. सचिन बिचू, सचिव श्री. सहल फडके…. सजिनदार श्री सागर पाटनेकर”
उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना वार्षिक कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली आणि त्यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले.
शाळेच्या गायन गटाने इशारतवन सादर केले. इयत्ता तिसरीतील कुमार रुद्रांश गडगाणे आणि इयत्ता दहावीतील कुमार श्रेयश वाडेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रमुख पाहुण्या श्रीमती स्नेहल कांडेकर आणि डॉ. दीप्ती शेट्टी यांचा व्यवस्थापन समिती सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शालेय मंत्रिमंडळाच्या पंतप्रधान कुमारी सानिका हणमशेट यांनी प्रमुख पाहुण्या व व्यवस्थापन समिती सदस्यांचे स्वागत केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कविता परमाणिक यांनी शाळेच्या व्यवस्थापन समिती सदस्यांचा सत्कार केला. शाळेतील कार्यक्रमांची, उपलब्धिंची व विद्यार्थ्यांच्या कामगिरीची झलक स्लाईड शोद्वारे दाखवण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कविता परमाणिक यांनी वार्षिक अहवालाद्वारे शाळेतील उपक्रम आणि यशाची माहिती दिली. सह-अभ्यासक्रमातील उपक्रमांमध्ये, आंतरशालेय स्पर्धांमध्ये आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा क्षेत्रातील यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्माननीय प्रमुख पाहुणे आणि व्यवस्थापकीय समिती सदस्यांनी सत्कार केला. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित पालकवर्ग व विद्यार्थ्यांना संबोधित केले आणि त्यांच्या भाषणाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रम भव्य होता. हा सांस्कृतिक कार्यक्रम या शैक्षणिक वर्षाच्या ‘भारताचे नृत्य प्रकार’ या शीर्षकावर आधारित होता. महिला विद्यालय मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळेच्या गायन गटाने ‘भारताचे नृत्य प्रकार’ हे शैक्षणिक वर्षाचे शीर्षक कवितेने सादर केले. विद्यार्थ्यांनी विविध नृत्य प्रकार, नाटक, गाणे इत्यादी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मुख्याध्यापिका श्रीमती कविता परमाणिक, सहाय्यक शिक्षिका श्रीमती दीपा बागेवाडी आणि श्रीमती जया याळगुकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. दहावीची विद्यार्थिनी कुमारी समृद्धी शामप्रसाद आणि चौथीचा विद्यार्थि कुमार अकुल यादव्ळि याने आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कविता परमाणिक आणि सर्व सहाय्यक शिक्षकांनी परिश्रम घेतले. शाळेच्या व्यवस्थापकीय समिती सदस्यांनी व पालकवर्गाने या कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले.



