के.एल.ई. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या
केमिकल इंजिनिअरिंग शाखेत कु. प्रार्थना बाबू खंगावणकर हिने आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीने
सुवर्ण पदक मिळवून स्पृहणीय यश संपादन केले आहे. शालेय जीवनापासून एक हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रार्थना हिने केमिकल इंजिनिअरिंग शाखेत सुवर्ण पदक पटकावल्यामुळे तिचे आई-वडील नलिनी व बाबू खंगावणकर, आजी-आजोबा आशा व मारुती खन्नुकर, मामी-मामा सविता व निरंजन खन्नुकर, नुतन व प्रसाद खन्नुकर, मावशी नंदिनी खन्नुकर वगैरे सर्व कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच उपरोक्त यशाबद्दल प्रार्थना खंगावणकर हिचे विद्यापीठातील तिच्या शाखेसह सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रार्थना खंगावणकर हिला केमिकल इंजिनिअरिंगमध्ये सुवर्ण पदक



