कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या उत्तरार्धात गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. सुवर्णविधानसौधमधील तिसऱ्या मजल्यावर ही बैठक होणार असून यासंबंधीचे सूचनापत्र सोमवारी जारी करण्यात आले आहे.
गुरुवार दि. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत उत्तर कर्नाटकच्या विकासासंबंधी महत्त्वाचे
निर्णय होण्याची शक्यता आहे. सोमवारी अधिवेशनाचे सहा दिवस उलटले. आता केवळ कामकाजाचे चारच दिवस शिल्लक राहिले आहेत. शेवटच्या दिवशी शुक्रवारी १९ डिसेंबर रोजी दुपारपर्यंतच कामकाज चालते. ही गोष्ट लक्षात घेतली तर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे तीन दिवसच कामकाजासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे उशिरापर्यंत मंगळवारपासून विधिमंडळाचे कामकाज चालण्याची शक्यता आहे.



