समगार (चर्मकार) हरळय्या समाजनेत्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यामार्फत मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांना दिले.
चामड्यापासून पादत्राणे बनविणे हा समगार हरळय्या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. राज्यात या समाजाची लोकसंख्या मोठ्याप्रमाणात असून समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे. तसेच महामंडळाला स्वतंत्र निधी मंजूर करावा. हरळय्या यांच्या नावे गुरुपीठ स्थापन करण्यासाठी बेळगाव, हुबळी, विजापूर, बेंगळूर शहारात जागा मंजूर करण्यात यावी. लिडकर निगमवर समगार समाजातील व्यक्तीची अध्यक्ष किंवा तत्सम पदावर नेमणूक करण्यात यावी. बेंगळूरमधील नागरभावी येथे बीडीएमार्फत मंजूर करण्यात आलेल्या जागेवर शिवशरण हरळय्या भवन व कौशल्यविकास केंद्र स्थापनकरण्यास निधी मंजूर करावा. राज्याच्या विविध भागात उभारलेल्या समगार हरळय्या, कल्याणम शीलवंत व समगार भीमव्वा स्मारकांच्या विकासासाठी अनुदान मंजूर करावे. चर्मकारांना शेड, आयुर्विमा, घरे या योजनांचा लाभ द्यावा, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत
चर्मकार समाजाची विविध मागणी -जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन



