धावत्या कारने पेट घेतल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा बेळगाव- वेंगुर्ला रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ घडली. आगीत कारचा दर्शनी भाग जळाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
एमएच ४८ एसी ८९७३ क्रमांकाच्या कारमधून अभिषेक हरकुणी (मूळचे रा. बैलहोंगल, सध्या रा. हनुमाननगर) हे बेळगावला येत होते. हिंडलगा गणेश मंदिर ओलांडल्यानंतर महात्मा गांधी पुतळ्याजवळ बोनेटमधून काहीतरी जळाल्याचा वास आला त्यामुळे अभिषेक यांनी कार उभी करून बोनेट उघडले. थोड्या वेळात इंजिनने पेट घेतला.
काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असणार म्हणून पाहणी करण्यासाठी रस्त्याशेजारी कार उभी केल्यामुळे अभिषेक हे खाली उतरले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण
कारला लागलेली आग.
करण्यात आले. जवानांनी पाण्याचे फवारे मारून आग विझविली. आगीत इंजिनचा भाग व वायरिंग पूर्णपणे जळून खाक झाले आहे.
घटनेची माहिती समजताच कॅम्प पोलीस व वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी रात्री ९.३० नंतर ही घटना घडली आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. तांत्रिक बिघाडामुळे आगीची घटना घडली असावी, असा संशय आहे



