दुचाकी घसरून पडल्यानंतर मागून येणारी कार डोक्यावरून गेल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना कणबर्गी रोडवरील सुरभी हॉटेलजवळ घडली आहे. टोनी अँथोनी डालमेट (वय २६, रा. युवकाचे नाव आहे.
कणबर्गी रोडवरील सुरभी रुक्मिणीनगर) असे त्या हॉटेलजवळील घटना
टोनी हा ट्रकचालक होता. ख्रिसमस असल्याने तो सुट्टीवर कोल्हापूर येथून बेळगावला आला होता. रविवारी रात्री हॉटेलमध्ये जेवायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. जेवण केल्यानंतर तो दुचाकी घेऊन घराकडे परतत जात होता. यावेळी दुचाकीचे नियंत्रण सुटून तो रस्त्यावर पडला. याचवेळी मागून येणाऱ्या एका वाहनाने त्याला चुकविले. मात्र, त्या वाहनाच्या मागून येणारी कार त्याच्या डोक्यावरून गेली.
या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. घटनेची नोंद उत्तर रहदारी पोलिस स्थानकात झाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.



