प्लॅनेट मराठी’ओटीटीचे वर्षभराचे फ्री सबस्क्रिप्शन
८ मार्च म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन. मातृत्व आणि कर्तृत्व अशा दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पेलणाऱ्या स्त्रियांसाठी खरंतर प्रत्येक दिवस हा महिला दिन म्हणून साजरा केला पाहिजे. हा दिवस रोजच साजरा व्हावा, यासाठी प्लॅनेट मराठी ओटीटी जगभरातील महिलांसाठी घेऊन येत आहे एक खास भेट. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने जगभरातील महिलांना ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे वर्षभराचे फ्री सबस्क्रिप्शन मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संचालक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”आज महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. स्त्रियांची ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. आज आम्ही जगभरातील महिलांना ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे वर्षभराचे फ्री सबस्क्रिप्शन देत आहोत याचे मुख्य कारण म्हणजे घर, नोकरी, मुले यांचा ताळमेळ साधत असताना स्त्रियांमधील ‘मी टाईम’ हा कुठेतरी हरवत चालला आहे आणि तो त्यांना परत मिळवून देण्याच्या दृष्टीने आम्ही हे पाऊल आजच्या या खास दिनी उचलले आहे. स्त्रियांना त्यांच्या मनोरंजनासाठी वेळच मिळत नाही. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या माध्यमातून त्यांना त्यांच्या आवडीचे मनोरंजनात्मक कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही पाहता येतील. चित्रपट, वेबसिरीज, टॉक शो, संगीत अशी मनोरंजनाची विविध माध्यमे इथे उपलब्ध आहेत. या निमित्ताने आम्हाला जगभरातील स्त्रियांचा सन्मान करण्याची संधी मिळत आहे. ही योजना जगभरातील स्त्रियांसाठी असून त्याचा लाभ केवळ आजच घेता येणार आहे.”