दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने 8 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या महिला दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुरस्कार 2022 देण्यात येणार आहे. तसेच यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे
सदर कार्यक्रम हिंदवाडी येथील आदर्श नगर मधील आयएमईआर सभागृहात दिनांक 8 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पार पडणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार मंगला अंगडी ,पोलीस उपायुक्त पी व्ही स्नेहा उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्वांनी या महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन डॉ सोनाली सरनोबत यांनी केले आहे .