बेळगाव येथील सरदार मैदानाजवळ सोमवारी रात्री पन्नी या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या जोडगोळीला खडेबाजार पोलिसांनी अटक करून त्यांच्याजवळील 64 हजार रुपयांचे अमली पदार्थ आणि इतर सामग्री जप्त केली आहे.
तौसिफ रियाज निजामी (वय26) रा.उज्वल नगर बेळगाव आणि सूरज अजय बनस्कर (वय 25) रा. सदाशिवनगर बेळगाव अशी अटक केलेल्यांची नावे आहे.
सोमवारी रात्री 9 च्या सुमारास दोघेही काळ्या प्लास्टिक बॅग मधून या अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती मिळताच खडे बाजार पोलिसांनी धाड टाकून अंमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडून त्यांच्या जवळील 48 ग्रॅम 400 मि ली पन्नी ज्याची अंदाजे किंमत 64750 रुपये सह दोन मोबाईल फोन जप्त केले.
या प्रकरणी खडे बाजार पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.