नुकत्याच बेंगळूर येथे पार पडलेल्या कर्नाटक राज्यस्तरीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप 21-22 मध्ये जलतरणपटू अनिकेत चिदंबर पिळणकर याने तीन सुवर्णपदके पटकविली आहेत.12 वर्षीय अनिकेत चिदंबर पिळणकर याने एस 5 श्रेणीमध्ये 50 मीटर बॅकस्ट्रोक, 50 मीटर फ्री स्टाईल आणि 100 मीटर फ्री स्टाईल अशा 3 स्पर्धा प्रकारात प्रत्येकी प्रथम क्रमांक पटकावत एकूण 3 सुवर्णपदके मिळविली.बाजार गल्ली वडगांव येथील रहिवासी असणारा अनिकेत पिळणकर हा मुक्तांगण शाळेचा विद्यार्थी असून गेल्या 5 वर्षांपासून तो स्विमिंगचे प्रशिक्षण घेत आहे. अनिकेतने संपादन केलेल्या ह्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्यस्तरीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये अनिकेतन पिळणकरने पटाकविली तीन सुवर्णपदके

Must read
Previous articleअंमली पदार्थ विकणाऱ्या जोडगोळीला अटक
Next articleमुतगा येथे 10 एप्रिलला भरविला जाणार कुस्ती आखाडा