हनुमान यात्रेचे औचित्य साधून रविवार दि. 10 एप्रिल रोजी मुतगा ( तालुका : बेळगाव ) येथे कुस्ती आखाडा भरवण्यात येणार आहे. नुकत्याच कलमेश्वर मंदिरात झालेल्या गावकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.नियोजनासह विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीला पै.भावकाना पाटील, पै. श्रीकांत पाटील, आप्पाना बस्तवाड, पै.जोतिबा केदार, सातेरी पाटील, पै.सुहास पाटील, तुकाराम पाटील, नामदेव पाटील, जानबा पाटील, जयसिंग पाटील, पै.कृष्णा शिंदोळकर,सिद्दाप्पा पाटील, चंद्रकांत पाटील, बाळकृष्ण पाटील, भैय्याजी पाटील, पै.विलास पाटील पै.नवीन पाटील यांच्यासह कुस्ती कमिटीचे सदस्य, गावकरी उपस्थित होते.