बेळगुंदी येथे पश्चिम विभागाच्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या बेळगुंदी येथे शिवभुमी ट्यूबर आणि काजू उत्पादक कंपनीची सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी भाजप बेळगाव ग्रामीणचे अध्यक्ष संजय पाटील, माजी अध्यक्ष विनय विलास कदम, युवराज जाधव बेळगुंदी पंचायत अध्यक्ष हेमा हडगळ यांच्यासह आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत .या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी करून घ्यावा असे यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी बेळगुंदी ग्रामपंचायत उपाध्यक्षा बाळू कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सूर्यकांत चौगुले संचालक व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.