बेळगाव :
रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ अधिकृतपणे एक चेक पोस्ट उभारण्यात आला आहे या चेक पोस्टवर कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना माघारी पाठविण्यात येत आहे. मात्र चेक पोस्ट चुकविण्याच्या नादात अनेक जण वेगवेगळ्या मार्गांनी रेल्वे स्थानकाच्या बाहेर जात आहेत.
मध्य रेल्वे पोलीस कार्यालयाच्या बाहेरील एक हॉल आहे. तेथून काही व्यक्ती बाहेर पडत आहेत. तर काही प्रवासी ट्रेनच्या शेवटचा टोकावरून खाली उतरून गुड् शेठ रोड मार्गे जात आहेत. यामुळे बेळगाव मध्ये कोरोना संक्रमणाचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाचा सर्व चेक पोस्टवर प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
रिक्षा चालकांना मार्गदर्शन करण्याची गरज
तसेच शहरातील ऑटो रिक्षा चालक मास्क नसताना पॅसेंजर घेऊन जात आहेत. येथील रेल्वेस्थानक परिसरात तर प्रवाशांना रिक्षा चालक मास्क नसताना घेऊन जात आहेत. त्यामुळे सर्व रिक्षा चालकांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे बनले आहे.
तसेच या ठिकाणी जर कोणी संशयास्पद खोकल्याचे किंवा सर्दी झाल्याचे आढळल्यास रिक्षाचालकांनी आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना कळवावे. ही परिस्थिती फक्त रेल्वेस्थानकावर नसून मध्यवर्ती रेल्वे स्थानक या ठिकाणी देखील आहे त्यामुळे ऑटो चालक संघाला अधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन करून प्रशासनाला सहकार्य करण्यास सांगावे असे जाणकारांमधुन बोलले जात आहे.